शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मोदी काळात' मुख्यमंत्रिपद गमावणारे मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री, इतर 6 कोण? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 2:38 PM

1 / 7
Haryana Political Crisis: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपशासित हरियाणा राज्यात नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनीदेखील आपापले राजीनामे दिले आहेत. आता राज्यात नव्याने मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. राज्यातील भाजपा आणि जेजेपी यांच्यातील युतीदेखील तुटली आहे. दरम्यान, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्यापासून(2014) मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री आहेत, ज्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
2 / 7
त्रिवेंद्र सिंह रावत- त्रिवेंद्र सिंह रावत 18 मार्च 2017 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. 10 मार्च 2021 रोजी त्रिवेंद्र सिंह रावत यांना केवळ 3 वर्षे आणि 357 दिवसांचा कालावधी मिळाला आणि त्यानंतर भाजपने तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
3 / 7
तीरथसिंग रावत- तीरथसिंग रावत यांनाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही आणि निवडणुकीपूर्वी त्यांना खुर्ची सोडावी लागली. तीरथ सिंह रावत केवळ 116 दिवस मुख्यमंत्री होते. त्यानंतर पक्षाने पुष्कर सिंह धामी यांना राज्याचे मुख्यमंत्री केले.
4 / 7
आनंदी बेन पटेल- 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, त्या या पदावर जास्त काळ टिकल्या नाहीत. 2 वर्षे 77 दिवसांच्या कार्यकाळानंतर त्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यांच्यानंतर पक्षाने विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री केले.
5 / 7
विजय रुपाणी- रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातच्या 14व्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला, पण रुपाणी या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मात्र, 13व्या आणि 14व्या विधानसभेच्या कार्यकाळासह त्यांनी एकूण 5 वर्षे 37 दिवस मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर घालवले. त्यांच्यानंतर भाजपने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले.
6 / 7
बीएस येडियुरप्पा- कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केवळ तीन दिवसांचा होता. कर्नाटकात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपने बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा कार्यकाळ अवघ्या तीन दिवसांत संपला. त्यानंतर जनता दलाचे एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र, कुमारस्वामी यांनाही कर्नाटकच्या 15 व्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. सत्ता गमावल्यानंतर एक वर्ष 61 दिवसांनी कर्नाटकच्या 15 व्या विधानसभेत येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले, पण यावेळीही ते केवळ 2 वर्षे 2 दिवसच या खुर्चीवर राहिले. 15 व्या विधानसभेचा कार्यकाळ अजून बाकी होता, परंतु येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले, जे 15 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत मुख्यमंत्री राहिले.
7 / 7
देवेंद्र फडणवीस- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. फडणवीस यांनी हा कार्यकाळ पूर्ण केला, पण त्यांना अपेक्षेप्रमाणे पुढची टर्म मिळाली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी घाईघाईने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण अवघ्या पाच दिवसांत त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यांच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सध्या फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठिब्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकार