Gold-Silver Rate: सोन्याचा किंमतीत आज घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:48 PM2022-07-26T12:48:47+5:302022-07-26T12:56:26+5:30

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार नाही.

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार नाही. ग्राहक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करतात. त्यामुळे मागणी कायम राहील. त्यामुळे सोन्याचे भाव कमी होणार नाही.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,७८० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,५८० रुपये इतके आहे.

तर १ किलो चांदीचा दर ५४,५०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ४०० रुपयांची घट झाली आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.