वरुण-अनुष्काचा 'सुई धागा' चित्रपटाचा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 16:57 IST2018-02-13T16:54:18+5:302018-02-13T16:57:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांना 'सुई धागा' चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना वरुण धवनने लिहिलं आहे की, 'एक्स्क्लूझिव्ह - मौजी आणि ममतला 28 सप्टेंबरला भेटा'.

वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्माही दिसत आहे. दोघांचाही चित्रपटातील लूक अत्यंत साधा असणार असल्याचं पोस्टवरुन दिसत आहे.

शरत कटारिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

28 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे.

चित्रपटाची कथा ग्रामीण भागाशी संबंधित आहे. मध्य प्रदेशात या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे. वरुण-अनुष्काची जोडी ऑनस्क्रीन पाहण्याची चाहत्यांनाही उत्सुकता आहे.