परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली जपानी पदाधिकाऱ्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 21:51 IST2018-03-29T21:51:14+5:302018-03-29T21:51:14+5:30

जपानच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी जपानचे मंत्री आणि शिष्टमंडळांची भेट घेतली.

जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांची भेट घेऊन स्वराज यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली.

स्वराज यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे चेअऱमन फुमिओ किशिदा यांचीही भेट घेतली.

भारत आणि जपान हे जगासाठी काळीमा ठरलेल्या दहशतवादाशी एकत्रितपणे लढतील, असे सुषमा स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.