1 / 7हस्तिनापूर येथील पांडव टेकडीचे खोदकाम ७० वर्षांनंतर झाले आहे. या खोदकामामध्ये अशा वस्तू मिळत आहेत, ज्यांचा उल्लेख इतिहासकारांकडून अनमोल असा होत आहे. मेरठमधील राजकीय संग्रहालयामध्ये हस्तिनापूर येथील खोदकामामध्ये सापडलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तेव्हा सर्वजण त्याकडे पाहत राहिले.2 / 7मेरठमधील हस्तिनापूर नव्या रहस्यांवरून पडदा उघडत आहे. सत्तर वर्षांनंतर जेव्हा येथे उत्खनन करण्यात आले तेव्हा अनेक दुर्मीळ गोष्टी एएसआयला मिळाल्या. यातील काही वस्तू लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्या हस्तिदंतापासून बनलेला फासा आणि बाण लक्षवेधी आहे.3 / 7त्याशिवाय गुप्तकाळ आणि एनशिएंट मीडिवर काळातील गोष्टी पाहूनही लोक आश्चर्यचकीत होत आहेत. सर्वांच्या मते हस्तिनापूरची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे. येथे अशी अनेक गुपिते आहेत ज्यांचा उलगडा अजून व्हायचा आहे.4 / 7१९५२ नंतर २०२२ मध्ये उत्खननामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या, त्या खूप धक्कादायक आहेत. येथे हजारो वर्षे जुने फासे आणि मोहरा मिळाल्या आहेत. खोदकामामध्ये मिळालेला फासा पाहून लोक हा शकुनीमामाचा फासा तर नाही ना, अशी चर्चा करत आहेत. 5 / 7अधीक्षण पुरातत्त्ववेत्ते डॉ. डी. बी. गणनायक यांनी सांगितले की, हा फासा हस्तिदंतापासून बनलेला आहे. त्यावर एक, दोन, तीन, चार अशी चिन्हे आहेत. हा फासा कुणी धनाढ्य व्यक्तीच वापरत असेल. तो गुप्तकालीन असू शकतो. तो १५०० वर्षे जुना असू शकतो. 6 / 7या फाशासोबत उत्खननामध्ये २० हून अधिक मातीच्या मोहरासुद्धा मिळाल्या आहेत. राजाचं नाव लिहिलेल्या मोहरा मिळाल्याने एएसआयची टीमसुद्धा खूश झाली आहे. मातीच्या या मोहरांवर श्री विष्णू गुप्त असं लिहिलेलं आहे. डॉ. गणनायक यांनी सांगितले की, मोहरांवर लिहिलेल्या लिपीचंही अध्ययन केलं जाणार आहे. 7 / 7अधीक्षण पुरातत्त्ववेत्ते डॉ. डी. बी. गणनायक यांनी सांगितलं की, हाडांपासून तयार केलेले तीर आणि हाडांपासून बनवलेल्या सुयासुद्धा खोदकामात मिळाल्या आहेत. या खोदकामात मिळालेल्या प्रत्येक वस्तूचं शास्त्रीय संशोधन होणार आहे. विविध एजन्सी हस्तिनापूरमध्ये खोदकामात मिळालेल्या वस्तूंचा तपास करणार आहेत. दरम्यान डेटिंगनंतर या वस्तू महाभारतकालीन आहेत की नाही याची माहिती मिळणार आहे.