दिल्लीला पावसाने झोडपले, नागरिकांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 22:54 IST2017-09-22T22:48:17+5:302017-09-22T22:54:34+5:30

राजधानी दिल्लीला शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपले.
दिल्लीसह ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबादमध्ये झालेल्या पावसामुळे नागरिंकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली.
या पावसामुळे दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी साचले.
तसेच, अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दिल्लीत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे.