डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 20:27 IST2018-04-13T20:27:03+5:302018-04-13T20:27:03+5:30

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन केले.
या उद्धाटन समारंभाला जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोचा पर्याय निवडला.
नरेंद्र मोदी यांनी लोक कल्याण मार्ग ते अलीपूर रोड असा मेट्रोने प्रवास केला.मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. तसेच, प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 अलीपूर रोडवर बनलेले हे स्मारक आजपासून देशाच्या मानचित्रावर कायमचे कोरले गेले आहे.
ही इमारत भव्यदिव्य आहे. अटलजींचे सरकार होते, तेव्हा इथे राष्ट्रीय स्मारकासंबंधी चर्चा झाली होती. पण नंतर काँग्रेस सरकारच्या काळात या फायली बंद झाल्या, असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.