Donald Trump's Visit : ट्रम्प यांनी केलं भल्याभल्यांचं 'बारसं'; नावं ऐकून खो-खो हसतोय सोशल मीडिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 08:13 PM2020-02-24T20:13:36+5:302020-02-24T20:34:48+5:30

Donald Trump's India Visit

भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 लाखांहून अधिक लोकांसमोर मोटेरा स्टेडियमममध्ये भाषण दिलं.

परंतु या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही शब्दांचा उच्चार चुकीच्या पद्धतीनं केला आहे. ट्रम्प यांनी विचित्र पद्धतीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं आहे.

त्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममध्ये आपल्या भाषणात भारतीय शब्दांचा उच्चार चुकवला आहे.

लोकांनी ट्रम्प यांनी चुकीच्या पद्धतीनं उच्चारलेले भारतीय शब्द सोशल मीडियावर शेअर करत त्यांना ट्रोल केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणादरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचं चुकीच्या पद्धतीनं उच्चारलं आहे.

ट्रम्प म्हणाले, आम्ही जगातील सर्वात महान क्रिकेटपटूंचा सन्मान करतो, तो म्हणजे 'सूचीन तेंडुलकर्र' आणि 'विराट खोली'.

त्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांना वाईट पद्धतीनं ट्रोल केलं आहे. सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये 30 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं तेंडुलकर याचं नाव घेतलं, ते पाहता त्यांना क्रिकेटमध्ये फारशी आवड असल्याचं दिसत नाही.

नमुस्ते, टी वाला, गुजात, स्वामी विवेकामुनंद, शोजे, सुचीन, विरोट, सरडा पटेल, आशम, टाज महल, चँड्रयान अशा शब्दांचा चुकीच्या पद्धतीनं उच्चार केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शोलेला शोजे (Sholay - Shojay), वेदांना वेस्टा (The Vedas - The Vestas) असं म्हटलं आहे.

परंतु जास्त करून लोकांनी ट्रम्प यांनी उच्चारलेल्या चुकीच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं आहे.

तसेच भाषणात वापरलेल्या भारतीय शब्दांबद्दल काहींनी त्यांचं कौतुकही केलं आहे.