शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सलाम! पुलवामाचा बदला घेण्यासाठी 'ते' सुट्टी अर्ध्यावर टाकून परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 4:14 PM

1 / 6
भारतीय सुरक्षा दलांनी आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैशचा कमांडर अब्दुल रशीद गाझीचा पुलवामाच्या पिंगलनमध्ये खात्मा केला. या कारवाईत दक्षिण काश्मीर पोलिसांचे डीआयजी अमित कुमार जखमी झाले.
2 / 6
अमित कुमार यांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचं नेतृत्त्व केलं. यावेळी त्यांच्या पायाला गोळी लागली. पोलीस आणि लष्कराच्या या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे दोन कमांडर आणि चार दहशतवादी मारले गेले.
3 / 6
अमित कुमार गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर होते. मात्र पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. यानंतर कुमार लगचेच ड्युटीवर परतले. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी सुट्टी अर्ध्यावर सोडली.
4 / 6
अमित कुमार अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईचं नेतृत्व करणाऱ्या कुमार यांनी काश्मिरी तरुणांसाठी अनेक उपक्रमदेखील राबवले आहेत.
5 / 6
काश्मिरी तरुणांनी दहशतवाद्याच्या मार्गानं जाऊ नये, यासाठी कुमार सतत प्रयत्न करतात. मात्र हेच तरुण दहशतवादी झाले, त्यांनी बंदूक हाती घेतली, तर देशाच्या संरक्षणासाठी कुमार त्यांच्याविरोधात कारवाई करत आपलं कर्तव्य अगदी चोख बजावतात.
6 / 6
सध्या अमित कुमार यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्तव्यनिष्ठा जपणाऱ्या कुमार यांचं आज लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत तोंडभरुन कौतुक केलं.
टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी