मुकेश अंबानींसाठी धीरुभाईंनी असा शिक्षक नेमला होता, जो शिकवत नसे...; जाहिरात पाहून भलेभले चाट झालेले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:12 PM2023-02-09T18:12:14+5:302023-02-09T18:20:39+5:30

दहावीपर्यंत शिकलेले धीरूभाई इतरांसारखे नव्हते, तर वेगळी विचारसरणी असलेली व्यक्ती होते. पेपरमध्ये जाहिरात दिलेली...

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी 60 च्या दशकात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मुकेश अंबानींसाठी खास शिक्षक शोधला होता.

शालेय शिक्षण देणार नाही असा शिक्षक त्यांना हवा होता.

धीरूभाई अंबानींनी मुलगा मुकेश अंबानीसाठी शिक्षक नियुक्त केला जो शिकवण्याशिवाय सर्व काही करू शकत होता.

या शिक्षकाचा तसा शोधही घेण्यात आला. तर वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यांनी या शिक्षकाची निवड केली होती.

धीरुभाईंनी जाहिरातीत लिहिले होते की, आम्हाला अशा शिक्षकाची गरज आहे जो शालेय पुस्तके शिकवणारा नसावा.

धक्का बसला नाही ना, खरं तर धीरूभाईंना सामान्य ज्ञान, व्यवहार ज्ञान देणारा व्यक्ती हवा होता, जो मुकेश अंबानींना उद्योगांच्या दृष्टीने तयार करेल.

खुद्द मुकेश अंबानी यांनी याबाबत सांगितले आहे. महेंद्रभाईंची बरीच शोधाशोध करून निवड करण्यात आली होती.

पुस्तकी दुनियेत वेळ घालवण्याऐवजी मुकेश अंबानींच्या व्यावहारिक ज्ञानाकडे अधिक लक्ष दिले गेले.

दहावीपर्यंत शिकलेले धीरूभाई इतरांसारखे नव्हते, तर वेगळी विचारसरणी असलेली व्यक्ती होते, असे म्हणतात.

धीरूभाईंच्या या विचारसरणीने त्यांना जमिनीवरून आकाशात नेण्याचे काम केले. आज जग त्यांचे उदाहरण देतेय.

वडिलांनी दिलेल्या धड्यांमुळे मुकेश अंबानी आज अव्वल श्रीमंतांमध्ये गणले जातात आणि व्यवसायाला नवीन उंचीवर नेत आहेत.