सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:41 IST
1 / 8दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण i20 कार स्फोटामागील गूढ आता उलगडत आहे. तपास यंत्रणांना या स्फोटामागे असलेले दहशतवादी नेटवर्क केवळ राजधानीपुरते मर्यादित नसून त्याचे जाळे फरिदाबादपासून काश्मीर, उत्तर प्रदेश आणि गुजरातपर्यंत पसरले असल्याचे आढळले आहे.2 / 8स्फोटासाठी वापरलेली पांढरी i20 कार तब्बल १० तास ४८ मिनिटे दिल्लीत फिरत होती. या वेळेत नेमकी कुठे गेली, याचा 'मिनिट-टू-मिनिट' तपास आता समोर आला आहे.3 / 8पोलिसांच्या स्पेशल सेलने १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, कारच्या हालचालींचा संपूर्ण तपशील समोर आला आहे. ही कार हरियाणातील फरिदाबादमधून खरेदी केलेली होती.4 / 8सोमवारी सकाळी सकाळी ८:०४ वाजता ही कार बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीत दाखल झाली. यानंतर १६ मिनिटांत ही कार ओखला इंडस्ट्रियल एरिया येथील पेट्रोल पंपावर थांबली. 5 / 8दुपारी ३:१९ वाजता ही कार तब्बल ७ तासांनंतर कार लाल किल्ल्याजवळील सुनहरी मशीद पार्किंगमध्ये शिरली आणि जवळपास तीन तास तिथेच उभी होती. 6 / 8सायंकाळी ६:२२ वाजता ही कार त्या पार्किंगमधून बाहेर पडली आणि दरियागंज-काश्मिरी गेटच्या दिशेने निघाली. याच्या अवघ्या ३० मिनिटांत कारमध्ये भीषण स्फोट झाला. 7 / 8जम्मू-काश्मीर पोलिसांनी लखनऊमधून डॉ. शाहीन शाहिद या महिलेला अटक केली आहे. तिच्या कारचा वापर डॉ. मुझामिल नावाच्या व्यक्तीकडून रायफल आणि जिवंत काडतुसे वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.8 / 8तपास यंत्रणा आता १३ संशयितांची कसून चौकशी करत आहेत. या स्फोटाची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.