शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: देशात नव्या 38 हजार 948 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 11:15 AM

1 / 6
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 219 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,903 रुग्ण कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त झाले आहेत.
2 / 6
देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. मंगळवारी 41965, बुधवारी 47092, गुरुवारी 45352, शुक्रवारी 42618, शनिवारी 42766 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
3 / 6
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 27 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 40 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 / 6
दिलासादायक बाब म्हणजे, 3 कोटी 21 लाख 81 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 4 हजार 874 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.
5 / 6
राज्यात रविवारी 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 916 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 94 हजार 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे.
6 / 6
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 48,54,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,86,174 (11.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,99,905 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,007 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई