शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: कोरोनाच्या आणखी लाटा येणार, ६ ते १८ महिने महत्त्वाचे ठरणार; भारतासाठी धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 5:11 PM

1 / 8
देशात आलेली कोरोनाची भयंकर दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज देशात तीन लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
2 / 8
येत्या काही महिन्यांत भारतात कोरोनाच्या आणखी लाटा येतील. त्यामुळे देशापुढील समस्या वाढतील, असं सौम्यानाथन म्हणाल्या. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढील ६ ते १८ महिने अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.
3 / 8
विषाणू स्वत:ला किती विकसित करतो, त्यावरून तो किती काळ टिकणार ते ठरतं, असं स्वामिनाथन यांनी 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
4 / 8
विषाणूच्या व्हेरिएंट्सविरोधात लसींची क्षमता आणि लसींमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टाकते, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे, असं सौम्यानाथन म्हणाल्या.
5 / 8
या घातक महामारीचा नक्कीच अंत होईल याची आम्हाला कल्पना आहे. २०२१ च्या अखेरपर्यंत जगातील जवळपास ३० टक्के लोकसंख्येचं लसीकरण अपेक्षित होईल अशी अपेक्षा आहे, असं सौम्यानाथन यांनी सांगितलं.
6 / 8
२०२१ च्या अखेरपर्यंत ३० टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालेलं असेल. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल. २०२२ मध्ये लसीकरणाला वेग देता येईल, असं त्या म्हणाल्या.
7 / 8
आपण महामाराच्या एका टप्प्यातून जात आहोत. अजून अनेक महत्त्वाचे टप्पे शिल्लक आहेत. पुढील ६ ते १२ महिन्यातील आपली कामगिरी निर्णायक ठरेल. हा काळ आपल्यासाठी कठीण असेल, असं स्वामिनाथन यांनी सांगितलं.
8 / 8
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि महामारीला समूळ नष्ट करण्यासाठी योजना आखावी लागेल. लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि कोरोना प्रादुर्भावामुळे तयार होणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमीत कमी ८ महिने टिकते, अशी माहिती त्यांनी दिली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना