शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:42 PM

1 / 12
कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
2 / 12
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे.
3 / 12
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या सव्वा लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
4 / 12
देशात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार 535 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 146 जणांचा मृत्यू झाला आहे.
5 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे अनेकांनी नातेवाईकांचे मृतदेह स्विकारण्यास नकार दिला आहे.
6 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे अनेकांनी नातेवाईकांचे मृतदेह स्विकारण्यास नकार दिला आहे.
7 / 12
आपले वाटणारे देखील परके झाले आहेत. अशातच एका कोरोना योद्ध्याने पुढाकार घेतला आहे. तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर त्याने अंत्यसंस्कार केले आहेत.
8 / 12
विष्णू असं या व्यक्तीचं नाव असून ते जयपूरमध्ये राहतात. निराधार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत असून ते व त्यांच्या टीमने मिळून आतापर्यंत 68 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
9 / 12
विष्णू आणि त्याच टीम कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. हे काम करण्यासाठी ते धर्म-जातीचा भेदभावही करत नाही.
10 / 12
अंत्यसंस्कार केलेल्यांमध्ये 15 मुस्लीम मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे आणि 53 मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे.
11 / 12
अनेकदा नातेवाईक रुग्णालयांमध्ये मृतदेह तसाच ठेवून निघून जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. हा मृतदेह तासनतास रुग्णालयात पडून राहतो.
12 / 12
कोरोना योद्ध्यांनी त्यामुळेच त्यांची शेवटची क्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूIndiaभारतhospitalहॉस्पिटल