CoronaVirusVaccine : कोरोनावरील स्वदेशी लस नेमकी कधी उपलब्ध होणार?, भारत बायोटेकने दिली महत्त्वाची माहिती

By सायली शिर्के | Published: October 24, 2020 10:42 AM2020-10-24T10:42:54+5:302020-10-24T11:21:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतीय कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) स्‍वदेशी कोरोना व्हायरस वॅक्‍सीन (Covid 19 Vaccine) 'कोवॅक्‍सिन' (Covaxin) वर काम करत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतीय कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) स्‍वदेशी कोरोना व्हायरस वॅक्‍सीन (Covid 19 Vaccine) 'कोवॅक्‍सिन' (Covaxin) वर काम करत आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कंपनीच्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली आहे. याच दरम्यान भारत बायोटेक कंपनीने मोठा दावा केला आहे.

कोरोना व्हायरसवरील ही ही स्वदेशी लस जून 2021 पर्यंत उपलब्ध होईल असा दावा कंपनीने केला आहे. हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी DCGI कडे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला होता.

कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 14 राज्यातील 20 हजारहून अधिक नागरिकांवर या लसीची चाचणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत या लसीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते.

स्वदेशी कोरोना लसीची माहिती मिळाल्यानंतर जूनपर्यंत ही लस उपलब्ध करून देता येऊ शकते असा दावा भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी केला आहे.

भारत बायोटेकच्या स्वदेशी कोरोना लसीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. लसीच्या चाचण्यांना यश मिळत असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक हे संयुक्तरीत्या विकसित असलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

भारत बायोटेक कंपनीने केंद्र सरकारकडे दोन ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह 19 ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात 18 वर्षे वयावरील 28500 स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे.

झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. अ‍ॅस्ट्राझेनिसा लसीच्या भारतातील चाचण्यांचा दुसरा व तिसरा टप्पा सिरमच्या सहकार्याने पार पडत आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाच वेगवेगळ्या कोरोना लसींचे 1 अब्ज डोस तयार करणार आहे. जगभरात या लसींचे वितरण केले जाईल. कोविशिल्ड, कोवोवॅक्स, कोविव्हवॅक्स, कोविवॅक आणि एसआयआय या लसींचा त्यात समावेश आहे.

2021 च्या वर्षाअखेरीपर्यंत हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास 1600 स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत.

लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राजेनेका या कंपनीशी भागीदारी केली आहे.4 आम्ही आधीच 2 ते 3 कोटी डोस तयार करत असून ही संख्या महिन्याला 7 ते 8 कोटींपर्यंत नेऊ शकतो.

लसीच्या आयुर्मानाची मर्यादा लक्षात घेता आम्ही जाणीवपूर्वक कमी उत्पादन करत आहोत, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. कोवोवॅक्स ही दुसरी लस सिरम इन्स्टिट्यूट लाईफ सायन्सेस या नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कंपनीमार्फत विकसित केली जाणार आहे.

बायोटेक कंपनी नोवोवॅक्सच्या सहयोगाने ही लस तयार केली जात आहे. कोवोवॅक्स लसीची पहिली चाचणी मे 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात सुरू झाली. तिचा दुसरा टप्पा आता सुरू होईल. 2021 मध्ये सिरमच्या मदतीने 1 अब्ज डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.

Read in English