CoronaVirus Live Updates : धोक्याचा इशारा! कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील 'या' शहरात 3 दिवसांचा लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:35 IST
1 / 14देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 3,42,15,653 वर पोहोचला आहे.2 / 14गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,451 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 585 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,55,653 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही ठिकाणी पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 4 / 149 मार्च 2020 रोजी सुरू झालेल्या साथीच्या आजाराने आतापर्यंत 1,39,925 लोकांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत 9 फेब्रुवारीपर्यंत 51,360 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 28 सप्टेंबरपर्यंत 87,542 लोकांचा मृत्यू झाला.5 / 14इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने पत्र लिहून राज्य सरकारल योग्य ते पाऊल उचलण्यास सांगितलं आहे. त्यामुळेच पश्चिम बंगाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण 24 परगाना जिल्ह्याच्या सोनारपूर नगर पालिका क्षेत्रात तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 6 / 14सोनारपूर नगरपालिका ही पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून जवळपास 20 किलोमीटर दूर आहे. सोनारपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच 28 ऑक्टोबरपासन तीन दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 / 14राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा करताना सोनारपूरच्या सर्व 35 वॉर्डमध्ये तीन दिवसांदरम्यान फक्त इमर्जन्सी सेवा सुरू असणार आहेत. बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत. येथे आतापर्यंत 19 कंटेन्टमेंट झोन आहेत. 8 / 14दुर्गा पुजेनंतर कोलकातामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 248 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 14देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्य मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि नागालँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दर तासाला कोरोना 14 लोकांचा बळी घेत आहे.10 / 14जुलैमध्ये मृत्यूदर 2.02 टक्के होता, तो आता 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपासून हा मृत्यूदर स्थिर आहे. राज्यातील 10 फेब्रुवारी ते 22 ऑक्टोबर या कालावधीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा काढला तर दर तासाला सरासरी 14 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.11 / 14सप्टेंबरपर्यंत राज्यात दर तासाला मृत्यूची संख्या 16 होती, ती ऑक्टोबरमध्ये ती थोडी कमी झाली असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.12 / 149 मार्च 2020 रोजी सुरू झालेल्या साथीच्या आजाराने आतापर्यंत 1,39,925 लोकांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत 9 फेब्रुवारीपर्यंत 51,360 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 28 सप्टेंबरपर्यंत 87,542 लोकांचा मृत्यू झाला.13 / 14तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं.14 / 14सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.