शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: दिलासादायक! कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 4:03 PM

1 / 11
देशातील कोरोना बाधितांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेला आहे. देशात दररोज जवळपास ९० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.
2 / 11
कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत सध्या जगात दुसऱ्या स्थानी आहे. आता केवळ अमेरिका भारताच्या पुढे आहे.
3 / 11
एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे.
4 / 11
काल दिवसभरात जवळपास ९५ हजार ८८० जणांनी कोरोनावर मात केली. तर ९३ हजार ३३७ जणांना कोरोनाची लागण झाली. म्हणजेच काल कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक होती.
5 / 11
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना बाधितांची संख्या ५३ लाख ८ हजार १४ इतकी आहे.
6 / 11
आतापर्यंत ४२ लाख ८ हजार ४३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट ७९.२८ टक्के इतका आहे. या बाबतीत भारतानं अमेरिकेला मागे टाकलं आहे.
7 / 11
देशात आतापर्यंत ८५ हजार ६१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील १ हजार २४७ जणांनी काल दिवसभरात प्राण सोडला.
8 / 11
कोरोनामुळे असलेला मृत्यूदर सध्या १.६१ टक्क्यांवर आला आहे. तर सध्याच्या घडीला १० लाख १३ हजार ९६४ जणांवर उपचार सुरू आहेत.
9 / 11
देशातील कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग धडकी भरवणारा आहे. ७ ऑगस्टला देशातील कोरोना बाधितांचा आकडा २० लाखांच्या पुढे गेला.
10 / 11
त्यानंतर अवघ्या १६ दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली. ५ सप्टेंबरला हाच आकडा ४० लाखांच्या पुढे गेला.
11 / 11
१६ सप्टेंबरला देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यानं ५० लाखांचा टप्पा ओलांडला. कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता आता सगळ्यांचंच लक्ष कोरोनावरील लसीकडे लागलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या