६४ दिवसांत भारतात कोरोनाचे रुग्ण लाखाच्या घरात; जाणून घ्या इतर देशांमधील आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 17:48 IST2020-05-19T17:41:50+5:302020-05-19T17:48:14+5:30

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनानं भारतातही थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा लाखाच्या पुढे गेला आहे.
एक लाख कोरोना रुग्ण असलेला भारत हा जगातला ११ वा देश ठरला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात तीन हजाराहून अधिक जणांनी जीव गमावला आहे.
मात्र भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग बऱ्यापैकी कमी असल्याचं आकडेवारी सांगते. भारतात रुग्णांचा आकडा लाखाच्या घरात पोहोचण्यासाठी ११० दिवस लागले.
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी आढळला. सुरुवातीला महिनाभर कोरोना संक्रमणाचा वेग कमी होता.
मार्चनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली. अवघ्या ६४ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १०० हून १ लाखावर पोहोचला.
गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोना रुग्णांचा वेगानं वाढतो आहे. मात्र अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्सच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढण्याचा वेग सर्वाधिक वेग होता. १०० ते १ लाख रुग्णांचा टप्पा अमेरिकेनं अवघ्या २५ दिवसांत गाठला.
स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ३० दिवसांमध्ये एक लाखाच्या घरात गेली.
जर्मनीमधील कोरोना बाधितांची संख्या ३५ दिवसांत १०० वरुन लाखावर पोहोचली.
इटलीमधील कोरोना रुग्णांची संख्या ३६ दिवसांमध्ये १०० वरुन १ लाखांवर गेली.
फ्रान्सनं ३९ दिवसांमध्ये १०० ते १ लाख रुग्णांचा टप्पा गाठला.
ब्रिटनमधल्या कोरोना बाधितांचा आकडा ४२ दिवसांत १०० वरुन १ लाखांवर गेला.