शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : 'शब ए-बारात' साजरी करण्यासाठी रस्त्यावर याल तर खबरदार, पोलीस है तैय्यार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 4:38 PM

1 / 12
राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मुस्ली ममाजातील नागरिकांना एकत्र येऊन मरकज कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. तेथून कोरोनाच प्रादुर्भाव होण्यास मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. लॉकडाऊन कालावधीत गुरुवारी शब ए-बारात हा मुस्लीम बांधवांचा कार्यक्रम आहे.
2 / 12
मुस्लीम नागरिकांसाठी नमाज अदा करुन ज्ञान ग्रहण करण्याची ही रात्र मानली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव अल्लाचे स्मरण करतात, आपले सर्व गुन्हे कबुल करत अल्लाची प्रार्थना करतात. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास मुस्लीम समाजातील लोक शब ए-बारातच्या दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले आहेत.
3 / 12
मात्र, यंदा पोलिसांनी शब ए-बारातच्या कार्यक्रमदिनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन मुस्लीम समुदायाला केले आहे.
4 / 12
दिल्लीतील मुस्लीम समुदायाचे नागरिक शब-ए-बारात दिनी घरातून बाहेर पडतात. विशेष म्हणजे आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांमधून फिरतात, बाहेर एकत्र जमतात. मात्र, निजामुद्दीन मरकझसारखी चूक आता दिल्ली पोलीस होऊ देणार नाहीत.
5 / 12
दिल्ली पोलिसांनी शब ए-बारात दिनी रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. यादिवशी रस्त्यावर दिसून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. सध्या, राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
6 / 12
विशेष म्हणजे निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमातूनही हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे, आता दिल्ली पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
7 / 12
गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतल शब ए-बारात दिनी नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. दिल्लीतील मुस्लीम युवक आपल्या दुचाकी वाहनांवरुन एकत्रितपणे शहरात फिरतात. त्यामुळे, दिल्ली पोलीस, ट्रॅफि पोलीस यांनी बाहेर फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच, केंद्रीय निमलष्करी दलासही पाचारण करण्यात आले आहे.
8 / 12
दरम्यान, गेल्या ८ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास शब ए-बारात दिनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
9 / 12
याप्रकरणी पोलिसांनी कारवाईही केली आहे. त्यामध्ये, दिल्ली गेट, जुनी दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि दुसऱ्या रस्त्यांवर हजारो बाईक्स फिरताना दिसून येतात. त्यामुळे दिल्ली पोलीस जवळपास १२५ जागांवर बॅरिकेट्स लावते. यावेळी, दिल्ली पोलीस आयुक्त एसएन. श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हा डीसीपींना यासंदर्भात सक्त आदेश दिले आहेत.
10 / 12
त्यामुळे दिल्ली पोलीस जवळपास १२५ जागांवर बॅरिकेट्स लावते. यावेळी, दिल्ली पोलीस आयुक्त एसएन. श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हा डीसीपींना यासंदर्भात सक्त आदेश दिले आहेत.
11 / 12
तसेच, ते स्वत: यावर नजर ठेऊन आहेत. तर, संबंधित शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना आणि नेत्यांनाही लोकांना घरीच बसण्याचे आवाहन करण्याचे सूचवले आहे.
12 / 12
तसेच, ते स्वत: यावर नजर ठेऊन आहेत. तर, संबंधित शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना आणि नेत्यांनाही लोकांना घरीच बसण्याचे आवाहन करण्याचे सूचवले आहे.
टॅग्स :delhiदिल्लीMuslimमुस्लीमPoliceपोलिस