शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: हे कारण वाढवतेय भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका, तज्ज्ञांचीही वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 11:33 AM

1 / 10
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भारतासमोरील आव्हान दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. विशेषत: मे महिन्यामध्ये देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र भारतातमध्ये काही कारणांमुळे कोरोनाविरोधातील लढाई कठीण बनली आहे.
2 / 10
त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतात कोरोनाच्या असिम्थमॅटिक म्हणजेच लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार २२ जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान भारतात करण्यात आलेल्या ४० हजार १८४ चाचण्यांपैकी २८ टक्के रुग्णांमध्ये असिम्थमॅटिक म्हणजेच लक्षणे दिसून आली नाहीत. दरम्यान, या प्रकारामुळे शास्त्रज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
3 / 10
हा अभ्यास करणाऱ्या लेखकांपैकी एक आणि असलेल्या मनोज मुरहेकर यांनी सांगितले की, लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही २८.१ टक्क्यांपेक्षा अधिक असू, शकते. आमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
4 / 10
लक्षणे आढळणाऱ्या आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमधील संपर्काचे प्रमाण सर्वाधिक होते. हे प्रमाण श्वसनाच्या गंभीर समस्या असलेले रुग्ण, परदेशातून आलेले रुग्ण आणि संसर्ग झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपेक्षा दोन-तीन पटींनी अधिक आहे.
5 / 10
या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग ५० ते ६९ या वयोगटातील लोकांना झाला आहे. हे प्रमाणा ६३.३ टक्के आहे. तर सर्वात कमी संसर्ग १० वर्षांखालील मुलांमध्ये दिसून आला आहे. हे प्रमाण ६.१ टक्के आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक झाला आहे.
6 / 10
भारतामध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण हे सुरुवातीपासूनच चिंतेचा विषय बनलेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात इशारा दिला होता. त्यानुसार देशातील कोरोनाचे ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनीही याचा उल्लेख केला होता.
7 / 10
जगभरातील संशोधनामधून हे समोर आले आहे की कोरोनाच्या १०० पैकी ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. किंवा अत्यंत सौम्य लक्षणे आढळतात. पुढे या रुग्णांपैकी १५ टक्के रुग्ण गंभीर आणि ५ टक्के रुग्ण अत्यवस्थ होतात.
8 / 10
याबाबत डॉ. रमण गंगाखेडकर यांनी २१ एप्रिलला सांगितले होते की, भारतात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी ६९ टक्के असिम्थमॅटिक आणि ३१ टक्के रुग्ण हे लक्षणे असणारे होते. याचा अर्थ आम्ही जेव्हा एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केली तेव्हा आम्हाला तीन ते चार असिम्थमॅटिक रुग्ण सापडले.
9 / 10
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाच माहिती मिळवण्यासाठी आयसीएमआरने सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संपर्कात आलेल्या असिम्थमॅटिक रुग्णांचा शोध घेण्यास मदत होईल.
10 / 10
या सर्व्हेमध्ये देशातील ७० जिल्ह्यांमध्ये लोकांची कोविड-१९ ची रँडम तपासणी करण्यात येईल. यामधून लोकांच्या शरीरामधील संसर्गाशी लढणाऱ्या अँटिबॉडीची माहिती मिळेल. सीरो सर्वेमुळे संक्रमणाचा शोध घेण्यास आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत