Fact Check : CoronaVirus News: कोरोनाला रोखण्यासाठी २५ सप्टेंबरपासून ४६ दिवसांचा लॉकडाऊन?; मोदी सरकारनं सांगितलं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 10:50 PM2020-09-14T22:50:05+5:302020-09-14T22:56:22+5:30

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या दररोज देशात कोरोनाचे ९० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे.

देशातील कोरोना बाधितांची संख्या ५० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सध्याच्या घडीला जवळपास १० लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात अनलॉक सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२५ सप्टेंबरपासून देशात लॉकडाऊन सुरू होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबद्दल पीआयबीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (एनडीएमए) २५ सप्टेंबरपासून देशव्यापी लॉकडाऊन करण्याची शिफारस केल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यात तथ्य नसल्याचं पीआयबीनं सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी एनडीएमएसह नियोजन आयोगानं पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयानं देशात २५ सप्टेंबरपासून लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी २५ सप्टेंबरपासून ४६ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

व्हायरल मेसेजमध्ये १० सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशाचा उल्लेख आहे. देशातील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी एनडीएमएनं पीएमओ आणि गृह मंत्रालयाला आधीच लॉकडाऊनची कल्पना दिल्याचा दावाही मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या पत्रकासह व्हायरल झालेला मेसेज फेक असल्याची माहिती पीआयबीनं दिली आहे.

एनडीएमएनं लॉकडाऊन संदर्भातला कोणताही आदेश काढला नसल्याचं पीआयबीनं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे.

Read in English