शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : सरपंचानं वाटलं लोणचं; आचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह, १०० गावकरी झाले क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:53 PM

1 / 14
कोरोनाच्या या संकटात संक्रमितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. बऱ्याचदा कोरोनाची कोणतीही लक्षणं नसतानाही रुग्ण संक्रमित होत असल्याचं समोर आलं आहे.
2 / 14
त्यामुळे अनेक जणांनी या कोरोनारुपी राक्षसाचा धसका घेतला आहे. तेलंगणातल्या महबूब नगरमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. त्यानं अख्खा गाव घाबरून गेला आहे.
3 / 14
तेलंगणातील महबूबनगरमधील नवाबपेट मंडळस्थित एका गावामध्ये खळबळ उडाली आहे. गावच्या सरपंचांनी काही दिवसांपूर्वी ४ हजार लोकांमध्ये आंब्याच्या लोणच्याचं वाटप केलं होतं.
4 / 14
लोणचं विकणारा व्यापारी आणि तो बनवणारे आचारी हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या नंतर गावात एकच गोंधळ उडाला असून, जवळपास 100 ग्रामस्थांना घरातच अलग ठेवण्यात आले आहे.
5 / 14
एकीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे कोल्लूरमध्ये विषाणूच्या भीतीने लोकांनी दुकाने बंद केली आहेत.
6 / 14
उन्हाळ्यात तेलंगणामध्ये आंब्याच्या लोणच्याला प्राधान्य दिले जाते. सरपंचांनी वाटलेलं लोणचं खाल्ल्यानं 112 ग्रामस्थांना सध्या घरातच अलग ठेवण्यात आलं आहे.
7 / 14
जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) डॉ. के. कृष्णा म्हणाले की, अद्यापपर्यंत कोणताही गावकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही.
8 / 14
डीएमएचओ म्हणाले, गावकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे.
9 / 14
होय, लोणचे खाल्ल्यानंतर काही गावकरी घाबरले आहेत. परंतु आम्ही त्यांना समजावून सांगितले की, लोणचे खाल्ल्याने त्यांना विषाणूची बाधा होणार नाही.
10 / 14
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सरपंच व तिच्या पतीने गावातील सर्व घरात लोणचे वाटण्याचा कार्यक्रम केला. आंब्याचे लोणचे बनविण्यासाठी तो व्यापा-यास भेटण्यासाठी शादपूरला गेला.
11 / 14
शादपूर हे कोल्लूरपासून 52 किमी अंतरावर आहे. लोणचे बनवण्यासाठी एका व्यापा-याने दोन स्वयंपाकांची व्यवस्था केली आणि ते गावात आले.
12 / 14
सरपंचांनी 12 जणांना एकत्र केले आणि आंबाच्या लोणचे बनविले. ते लोणचं खाऊन सगळेच कामाला लागले
13 / 14
दोन क्विंटल लोणचे तयार करण्यात आले. त्याच दिवशी काही लोकांनी लोणच्याची चव चाखली. दुसर्‍या दिवशी काही लोकांनी लोणचे खाल्ले, तर काहींनी बरणीत साठवून ठेवून घरी नेले.
14 / 14
व्यापारी आणि एक आचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच ग्रामस्थांना धक्काच बसला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या