Corona virus : ... म्हणून कारमध्ये एकटा प्रवास करणाऱ्यानेही मास्क घालावा, उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 11:28 AM2021-04-07T11:28:39+5:302021-04-07T11:52:58+5:30

Corona virus : कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्कला अहंकाराचा मुद्दा बनवू नका, असे दिल्ली हायकोर्टाने खडसावले आहे.

महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्कला अहंकाराचा मुद्दा बनवू नका, असे दिल्ली हायकोर्टाने खडसावले आहे.

एकट्याने खासगी कार चालविताना मास्क घातला नाही म्हणून दंड ठोठावला होता. त्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती प्रथिबा एम सिंग यांनी सांगितले की, कारमध्ये एकट्याने प्रवास करतानाही मास्क घालणे हा स्वतःच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी असतो.

कारण जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलजवळ वाहन थांबवते आणि खिडकीची काच खाली ठेवते. तेव्हा संसर्ग होण्याची शक्यता असते. तुम्ही यास अहंकाराचा मुद्दा बनवू शकत नाही.

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून दिल्लीतही मंगळवारी एकाच दिवसात 5100 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी यापूर्वीही एका प्रकरणात असेच आदेश दिले होते. मास्क न घालणाऱ्याला दंड आकारण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

वकील सौरभ शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी होती. सप्टेंबर, २०२० रोजी नोकरीसाठी जाताना दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी रोखले आणि मास्क न घालल्याबद्दल 500 रुपयांचा दंड केला.

कोरोनाचे संकट गहिरे होत चालले असून, पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसभरात एक लाखांचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी बाधितांची संख्या किंचित कमी झाल्याचे आढळून आले.

अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी भर द्यावा, असेही सूचवले आहे