Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोनाग्रस्तांमध्ये 'या' लसीचा सिंगल डोस करतोय कमाल; मजबूत झाली अँटीबॉडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:14 AM2021-11-04T11:14:02+5:302021-11-04T11:22:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने लसीकरण मोहीम ही सर्वच देशात सुरू असून कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. याच दरम्यान आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णसंख्या 248,824,610 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 5,037,026 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगभरात 225,450,289 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

वेगाने लसीकरण मोहीम ही सर्वच देशात सुरू असून कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. याच दरम्यान आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या लोकांवर रशियाची एक डोस असलेली स्पुटनिक लाइट लस (Sputnik Light Vaccine) महत्त्वाची ठरत आहे.

ही लस जास्त सुरक्षित आणि चांगली प्रतिकारशक्ती देणारी असल्याचं आता सिद्ध झालं आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सच्या निकालांमध्ये ही बाब समोर आली आहे.

गेल्या वर्षी लाँच केलेल्या दोन-डोस स्पुटनिक V लसीचे सौम्य स्वरूप असल्याचं मानली जात आहे ही सिंगल-डोस लस जी आधीच अभ्यासाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. रशिया स्पुटनिक लाइट लस निर्यातीसाठी त्याची मुख्य लस बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

सेंट पीटर्सबर्ग येथील लस निर्माता गमालेया संस्थेतील शास्त्रज्ञ 18-59 वयोगटातील 110 स्वयंसेवकांच्या इम्यून सिस्टम आणि महत्त्वपूर्ण साईड इफेक्ट्सवर लक्ष ठेवत आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांचं लसीकरण करण्यात आलं.

परिणामांमध्ये असे आढळून आले की ते कोरोना व्हायरसच्या मूळ प्रकारावर वेगाने कार्य करते, मात्र महामारीच्या अल्फा आणि बीटा प्रकारावर काम करण्याची गती थोडी मंद आहे. रशियामध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचे नवीन प्रकरणे आणखी समोर येत आहेत.

रशियाने आधीच दिलेल्या माहितीनुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की स्पुटनिक लाइट लस लसीकरणानंतर तीन महिन्यांपासून डेल्टा व्हेरिएंटवर 70 टक्के प्रभाव दर्शवते. अभ्यासात असे म्हटले आहे की स्पुटनिक लाइट केवळ प्राथमिक लसीसाठीच नाही तर पहिल्या कोविड-19 संसर्गानंतर लसीकरणासाठी देखील प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

द लॅन्सेट आणि गमालेया मधील 6,000 सहभागींसह आंतरराष्ट्रीय आणि प्लेसबो-नियंत्रित फेज III अभ्यासाच्या प्रकाशित चाचण्यांच्या निकालांवर आधारित स्पुटनिक लाइटला 6 मे रोजी रशियामध्ये क्लिनिकल वापरासाठी मंजूरी देण्यात आली.

भारताने 10 ऑक्टोबर रोजी अँटी-कोविड-19 लस स्पुटनिक लाइटच्या निर्यातीला परवानगी दिली. स्पुटनिक लाइट या अँटी-कोविड-19 लसीच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. स्पुटनिक लाइट हे रशियन लस स्पुटनिक V च्या घटक-1 सारखे आहे.

भारताच्या औषध नियामकाने एप्रिलमध्ये Sputnik V च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली, ज्याचा वापर भारताच्या COVID-19 विरोधी लसीकरण कार्यक्रमात केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read in English