कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:17 AM2020-07-02T08:17:33+5:302020-07-02T08:43:09+5:30

कोरोनाचा सर्वाधिक फटका जूनमध्ये बसला असून, देशात रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलेलं आहे. विशेष म्हणजे दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकार आणि डॉक्टरांचीही चिंता वाढली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका जूनमध्ये बसला असून, देशात रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. जूनमध्ये उष्णतेचा प्रकोपही जाणवला आणि लॉकडाऊनमध्येही काहीशी शिथिलता देण्यात आली होती.

त्यामुळेच कोरोनाचा फैलाव वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संशोधकांच्या अभ्यासानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही कोरोनाचा मोठा संसर्ग होण्याची भीती आहे.

जूनमध्ये 3.48 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. डेटा तज्ज्ञ दीपेंद्र राय म्हणतात की, जूनमध्ये रुग्ण आणि मृत्यू दोघेही सर्वाधिक आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, 31 मेपर्यंत देशात एकूण रुग्णांची संख्या 1,82,143 आणि 5,164 रुग्णांचा मृत्यू झाला. आता बुधवारी एकूण रुग्णांची संख्या वाढून 585,493 झाली आहे. 17,400 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळचे ज्येष्ठ डेटा तज्ज्ञ जेम्स विल्सन यांना अशी भीती आहे की, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातच ५ ते ६ लाखांहून अधिक रुग्ण समोर येतील. म्हणजेच रुग्णसंख्या १० लाखांच्या वर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये जास्त रुग्ण आणि मृत्यूची नोंद होऊ शकण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

नॅशनल पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट, चेन्नईचे वरिष्ठ प्राध्यापक एम. रामास्वामी यांनीसुद्धा कोरोना जुलै आणि ऑगस्टमध्ये हिमनगाचं टोक गाठू शकतो.

जुलै आणि ऑगस्टमध्ये जूनच्या तुलनेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

कोरोना भारतातून जाईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नसून संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळेच आरोग्य सेवा आणखी मजबूत करणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.