Christmas 2019: 'केक शो'ची धमाल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:47 IST2019-12-18T15:13:10+5:302019-12-18T15:47:16+5:30

ख्रिसमस आणि केक हे समीकरण कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील इन्स्टिट्यूट ऑफ बेकिंग अँड केक आर्टने वार्षिक केक शोचे आयोजन केले आहे.
विशेष म्हणजे, या केक शो मध्ये इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी 23 हून अधिक केकचे विविध मॉडेल तयार केले आहेत.
यामध्ये मॉस्कोतील सेंट बासिल कॅथेड्रलपासून ते चांद्रयान-2 यांसारखे केकचे मॉडेल तयार करण्यात आले.
या केक शोचे आयोजन 13 डिसेंबरपासून 1 जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे.