शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शादी करके पछताया...! UCC मध्ये लग्न, घटस्फोटाचे नियम बदलले; मोडले तर तुरुंगवारी, दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 4:00 PM

1 / 7
उत्तराखंड विधानसभेत मुख्यमंत्री धामी यांनी समान नागरी संहिता बिल सादर केले आहे. यावर आता चर्चा होईल आणि नंतर मतदानही होईल, आवश्यक बदलही केले जातील. परंतु अनेक गोष्टींमध्ये नियम कठोर करण्यात आले आहेत. लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा मुद्दा लग्न आणि घटस्फोटाचा विशेषकरून कठोर करण्यात आला आहे.
2 / 7
पहिली गोष्ट म्हणजे लग्नावेळी पुरुषाचे वय हे कमीतकमी २१ आणि स्रीचे वय हे १८ वर्षे असावे लागणार आहे. तसेच लग्न हे रजिस्टर करावेच लागणार आहे. यासाठी कलम ६ अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. असे न केल्यास २० हजारांचा दंड आकारला जाणार आहे.
3 / 7
जर घटस्फोट घ्यायचा असेल तर कोणताही पुरुष किंवा स्त्री कोर्टात तेव्हाच जाऊ शकते जेव्हा लग्नाला एक वर्ष झालेले असेल. म्हणजे लग्न झाल्या झाल्या कोणत्याही कारणाने कोणालाही घटस्फोटासाठी साधा अर्जही करता येणार नाहीय.
4 / 7
लग्न कोणत्याही धार्मिक प्रथेनुसार केले गेलेले असले तरी घटस्फोट हा केवळ न्यायालयीन प्रक्रियेमार्फतच केला जाणार आहे.
5 / 7
घटस्फोटानंतर पुनर्विवाह करण्याचा अधिकार तेव्हाच असेल जेव्हा कोर्ट घटस्फोटावर निर्णय देईल आणि या आदेशाविरोधात अपिल करण्याचा कोणताही अधिकार समोरच्या व्यक्तीला राहिलेला नसेल.
6 / 7
कायदा मोडून दुसरे लग्न केल्यास सहा महिन्यांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर घटस्फोट घेतल्यास तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होणार आहे.
7 / 7
दुसरे लग्न तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा दोघांच्या पार्टनरपैकी कोणी जिवंत नसेल. म्हणजेच आधीचा पती किंवा पत्नीचा मृत्यू झालेला असल्यासच दुसरे लग्न करता येणार आहे.
टॅग्स :marriageलग्नDivorceघटस्फोट