Asifa Bano: सेलिब्रेटींनी कठोर शब्दात केली असिफाला न्याय देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 20:06 IST2018-04-13T20:06:25+5:302018-04-13T20:06:25+5:30

कठुआत घडलेल्या असिफा बलात्कार व हत्या प्रकरणाचे कठोर पडसाद उमटत असताना. सेलिब्रेटींनी कडक शब्दात सुनावलं आहे. अभिनेत्री हुमा खुरेशीने हातात 'जस्टीस फॉर असिफा' लिहिलेला बॅनर घेऊन दुःख व्यक्त केलं.

गायक विशाल दादलानीनेही असिफाला श्रद्धांजली देत न्यायाची मागणी केली आहे.

आहाना कुमराने असिफाच्या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

आम्ही भारतीय. आम्हाला लाज वाटते. असिफाला न्याय मिळायला हवा, अशा आशयाचं पोस्टर हातात घेऊन अभिनेत्री स्वरा भास्करने हळहळ व्यक्त केली.

अभिनेत्री मिनी माथुरनेही घटनेचा निषेध केला.

अभिनेत्री गुल पनाग हिने असिफाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.