सीसीटीव्ही फोटो, व्हायरल व्हॉट्सअॅप चॅट्स; DSP कल्पना वर्मांनी सांगितलं मूळ प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:56 IST
1 / 7छत्तीसगढमधील पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा यांचे नाव अचानक देशभरात चर्चिले जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअपवरील काही चॅट्सही समोर आल्या आहेत. प्रेम, विश्वासघात आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत.2 / 7छत्तीसगढमधीलच एका व्यावसायिकाने कल्पना वर्मा यांच्यावर आरोप केले आहेत. दीपक टंडन असे या व्यावसायिकाचे नाव असून, त्यांनी २ कोटी रुपये, १२ लाखांची हिरेजडीत अंगठी, पाच लाखांची सोन्याची साखळी, टॉप्स, इनोव्हा क्रिस्टा कार आणि एक लाख रुपयाचे ब्रेसलेट कल्पना वर्मांनी घेतल्याचा आरोप केला आहे.3 / 7पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा यांच्यावर आरोप करताना दीपक टंडन यांनी त्यांच्यासोबतचे काही फोटो, व्हॉट्स चॅट्स आणि इतर फोटो पोलिसांना पुरावे म्हणून दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही टंडन यांनी केला. पण, या प्रकरणात पहिल्यांदाच कल्पना वर्मा यांनी त्यांची बाजू मांडली आहे.4 / 7पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यांनी त्यांच्यावर दीपक टंडन यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. कल्पना वर्मा यांनी सांगितले की, 'माझे वडील आणि दीपक टंडन यांच्यात देवाण-घेवाणीवरून जुना व्यावसायिक वाद प्रलंबित आहे. यात दीपक टंडन यांनी त्यांची पत्नी बरखा टंडन यांचा चेक दिला होता, जो बाऊन्स झाला होता.'5 / 7'त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयीन प्रक्रियेतून सुटका करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक माझे नाव या प्रकरणाशी जोडले गेले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असे कल्पना वर्मा यांनी म्हटले आहे.6 / 7'या सगळ्या आर्थिक वादाचा माझ्या पदाशी, माझ्या कार्यक्षेत्राशी तसेच माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी कोणताही संबंध नाही. असे असूनही मीडिया तसेच अन्य माध्यमांकडून चुकीची आणि निराधार माहिती दिली जातत आहे. यातून मला या वादात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून, हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि चारित्र्य हनन करण्याचीच प्रवृत्ती आहे', असे कल्पना वर्मा यांनी सांगितले.7 / 7'माझी परवानगी न घेता माझे फोटो, तसेच माझ्या सोशल मीडियावरील फोटोंचा उपयोग करून बनावट चॅट्स तयार करण्यात आले आहेत. हे एक गुन्हेगारी कृत्ये आहे. यासंदर्भात माझे कुटुंबीय वकिलांचा सल्ला घेत आहेत. संविधान आणि कायद्यावर विश्वास आमचा विश्वास आहे आणि त्याच रस्त्याने पुढे जाणार आहोत', असे पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यांनी खुलासा केला आहे.