शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:46 AM

1 / 10
5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे.
2 / 10
राममंदिराच्या पायासाठी १,२०० खांबांच्या निर्मितीचे काम १५ ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होईल व जून २०२१ पर्यंत पूर्ण होईल, असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले आहे.
3 / 10
या कामानंतर पायावरील कामाला सुरुवात होईल. त्यावर राफ्टचा प्लॅटफॉर्म बनेल आणि मग त्यावर सहा फूट उंच ढाचा. या ढाच्यावर मंदिराची निर्मिती होईल.
4 / 10
मंदिराच्या पायासाठी लागणाऱ्या कोरीव नक्षीदार खांबांचे मंदिर परिसरात आगमन होत आहे. कारखान्याच्या वर्कशॉपमधून हे खांब मंदिर परिसरात क्रेनच्या सहाय्याने आणले जात आहेत.
5 / 10
वैदीक रिती-रिवाजाच्या पूजनानंतरच हे कोरीव व आकर्षक नक्षीकाम केलेले खांब मंदिर परिसरात आणण्यात आले आहेत. मंदिरा निर्माण ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती आहे.
6 / 10
जेथे राममंदिर होणार आहे तेथे टेस्ट पिलरचे काम होत आहे. यासाठी तीन पिलरची निर्मिती केली जात असून, त्याच्या चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबरपासून इतर खांबांची निर्मिती होईल.
7 / 10
चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर राममंदिर बांधकामाला वेग येईल आणि जून २०२१ पर्यंत मंदिरासाठी आवश्यक 1,200 खांब बनवले जातील. पाया तयार झाल्यावर मंदिराच्या वरच्या भागाचे काम सुरू होईल.
8 / 10
2022 मध्ये राम जन्मभूमी मंदिराच्या एका तळाचे कार्य पूर्ण होईल, असे समजते. १,२०० खांब जमिनीत 100 फूट खाली असतील. त्यावर मंदिर उभे राहील.
9 / 10
१,२०० खांबांवर 06 फूट उंचीचा ढाचा असेल व त्यावर मंदिर उभे राहील. खांबांच्या चाचणीचे पूर्ण काम आयआयटी (रुरकी) आणि आयआयटीच्या (चेन्नई) देखरेखीत केले जात आहे. त्यात जमिनीची मजबुती आणि भार सहन करण्याची क्षमताही तपासली जात आहे.
10 / 10
पाया तयार केल्यानंतर मंदिराचा वरचा भाग तयार केला जाईल. जे खांब बनवले जाणार आहेत. त्याच्या काठाकाठाला सुरक्षा भिंतही उभी केली जाणार आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTwitterट्विटर