शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:06 IST

1 / 10
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक देशात पार पडत आहे. या निवडणुकीसाठी राजकारण रंगू लागले आहे. यावेळी प्रादेशिक राजकीय समीकरणामुळे ही निवडणूक रंजक बनली आहे. सी.पी राधाकृष्णन यांना भाजपा प्रणित एनडीएने उपराष्ट्रपति‍पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
2 / 10
दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीनेही सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना त्यांचे उमेदवार घोषित केले आहे. रेड्डी मूळचे आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी तालुक्यातून येतात. तर एनडीएने तामिळनाडूतून आलेले आणि विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी.पी राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या दोन्ही उमेदवारांमुळे दक्षिणेतील प्रादेशिक राजकारण चर्चेत आले आहे. त्याशिवाय एनडीए आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनाही धर्म संकटात टाकले आहे.
3 / 10
इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांचं नाव घोषित करून एनडीएला अडचणीत टाकले आहे. सुदर्शन रेड्डी यांच्यामुळे आंध्र प्रदेशातील राजकारणात नवीन समीकरण बनले आहे. आंध्र प्रदेशात सत्ताधारी तेलुगु देशम पार्टी आणि विरोधी पक्षातील वायएसआर काँग्रेस पक्ष या दोघांसाठी हा निर्णय आव्हानात्मक असणार आहे. टीडीपी एनडीचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे.
4 / 10
टीडीपीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रादेशिक अस्मिता आणि आघाडीचा धर्म यापैकी एक निवडणे कठीण जाणार आहे. सुदर्शन रेड्डी आंध्र प्रदेशातील असल्याने टीडीपीवर दबाव वाढला आहे. कारण रेड्डी ज्या राज्यातून येतात त्यांना उपराष्ट्रपती बनवण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे रेड्डींना पाठिंबा देण्यासाठी टीडीपीवर दबाव आहे.
5 / 10
दुसरीकडे वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी आधीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर एनडीए उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने जगन मोहन रेड्डी यांनाही गोंधळात टाकले आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचा मुख्य आधार रेड्डी समुदाय आहे.
6 / 10
सुदर्शन रेड्डी यांच्या नावामुळे रेड्डी समाजात प्रादेशिक भावना जागरूक झाल्या आहेत. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांना राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय अवघड जाणार आहे. त्यामुळे एनडीएला दिलेला शब्द पाळायचा की आपल्या राज्यातून विशेषत: रेड्डी समाजातून येणाऱ्या सुदर्शन रेड्डींना पाठिंबा द्यायचा या गोंधळात जगन मोहन रेड्डी सापडले आहेत.
7 / 10
एनडीएने तामिळनाडूच्या राजकारणावर समीकरण बनवत राधाकृष्णन यांना उमेदवारी घोषित केली. राधाकृष्णन ओबीसी समाजातून येतात. त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने डीएमकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. डीएमके इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. राधाकृष्णन हे मूळचे तामिळ असल्याने तिथे तामिळ अस्मिता मोठा मुद्दा आहे.
8 / 10
परंतु डीएमकेने सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून इंडिया आघाडीतील घटक पक्ष डीएमके विरोधकांसोबत एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आंध्र प्रदेशातील सुदर्शन रेड्डी यांच्यामुळे भाजपाचे गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
9 / 10
निवडणुकीतील राजकीय गणिते पाहिली तर एनडीएकडे लोकसभा आणि राज्यसभेत ४२२ खासदारांचे पाठबळ आहे. उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत उमेदवाराला जिंकण्यासाठी ३९४ मतांपेक्षा अधिक गरज आहे. एनडीएला वायएसआर काँग्रेसचं पाठबळ मिळाल्याने त्यांना मजबूत स्थितीत ठेवले आहे.
10 / 10
परंतु इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांचे नाव पुढे करून आंध्र प्रदेशातील प्रादेशिक अस्मितेला बळ दिले आहे. ज्यातून TDP आणि YSRCP खासदारांमध्ये क्रॉस व्होटिंग वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक केवळ उपराष्ट्रपति‍पदाची नाही तर त्यातून प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणाचीही मोठी परीक्षा आहे.
टॅग्स :National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा