सावधान! ATM मधून एकाचवेळी 5000 रुपये काढल्य़ास शुल्क आकारणार; आरबीआयकडे प्रस्ताव

By हेमंत बावकर | Published: October 18, 2020 11:08 AM2020-10-18T11:08:24+5:302020-10-18T11:14:07+5:30

Bank ATM withdrawal Charge: पाच ट्रान्झेक्शन झाल्यानंतर महिनाभरातील सहाव्या किंवा त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झेक्शनला शुल्क आकारले जात होते. हे शुल्क 20 रुपये होते. पण हा प्रस्ताव पास झाल्य़ास दुप्पट भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत एटीएममधून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे हे पाच मोफत ट्रान्झेक्शनमध्ये नसणार असून यासाठी तुमच्याकडून वेगळे शुल्क आकारले जाणार आहे.

हे शुल्क तेव्हाच आकारले जाईल जेव्हा तुम्ही एकाचवेळी ५००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम एटीएमद्वारे काढाल.

एकाच वेळी पाच हजारपेक्षा जास्त रक्कम काढल्यास कोणत्याही ग्राहकाला 24 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. सध्याच्या नियमानुसार पाच मोफत ट्रान्झेक्शन केली जाऊ शकतात. मात्र, त्यासाठी दिवसाचे लिमिट होते. तेवढीच रक्कम एका दिवशी काढता येत होती. हे लिमिट बँके-बँकेनुसार बदलत होते.

पाच ट्रान्झेक्शन झाल्यानंतर महिनाभरातील सहाव्या किंवा त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झेक्शनला शुल्क आकारले जात होते. हे शुल्क 20 रुपये होते.

आता मोफत ५ ट्रान्झेक्शनमध्ये जर 5000 पेक्षा जास्त जरी रक्कम काढली गेली तरी 24 रुपये आकराले जाण्याची शक्यता आहे.

तसेच सहाव्य़ा ट्रान्झेक्शनला आकारले जाणारे शुल्क 20 रुपये आणि जर त्याची रक्कम 5000 पेक्षा जास्त असल्यास त्यावरील शुल्क 24 रुपये असे 44 रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरीही ग्राहकांना नसता भूर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काची पडताळणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने त्याचा अहवाल दिला आहे. या आधारे बँका 8 वर्षांनंतर एटीएम शुल्कामध्ये बदल करू शकतात.

मध्यप्रदेशचे एसएलबीसी समन्वयक एस डी माहुरकर यांच्यानुसार समितीने दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये एटीएमद्वारे व्यवहार वाढविण्यावर भर दिला आहे.

या शहरांमध्ये लोक एटीएममधून छोटी-छोटी रक्कम काढतात. यामुळे समितीने या शहरांमधील छोट्या रकमेच्या व्यवहारांना फ्री ट्रान्झेक्शनमध्ये ठेवले आहे.

या छोट्या शहरांमध्ये ग्राहकांना दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला सहा वेळा पैसे काढण्याची सूट मिळणार आहे. सध्या छोट्या शहरांमध्ये पाच ट्रान्झेक्शन मोफत करता येतात.

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांना एका महिन्यात एटीएममधून तीन वेळाच मोफत पैसे काढण्याची सूट आहे. चौथ्या वेळेला शुल्क आकारले जाते.