शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:45 IST

1 / 5
बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर आपले उमेदवार उतरवले आहेत. बिहारमधील १५ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी उभे केले आहेत.
2 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी याबद्दलची माहिती दिली. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता प्रयत्न करताना दिसत आहे.
3 / 5
राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा घटक पक्ष आहे. मात्र, स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेत पक्षाने १५ उमेदवार जाहीर करत निवडणुकीत उडी घेतली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तेजस्वी यादव यांचा मतदारसंघ राघोपूरमधून अनिल कुमार सिंह यांना रिंगणात उतवले आहे.
4 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसने राजनगर विधानसभा मतदारसंघातून हरिलाल पासवान, नरकटियागंज मतदारसंघातून डॉ. राशिद अझीम, नौतन मतदारसंघातून जयप्रकाश कुशवाह, पिंपरा मतदारसंघातून अमित कुमार कुशवाह, मनिहारी मतदारसंघातून सैफ अली खान, परसा मतदारसंघातून विपिन कुमार पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
5 / 5
त्याचबरोबर सोनेपूर मतदारसंघातून धर्मवीर महातो यांना, महुआ मतदारसंघातून अखिलेश कुमार ठाकूर, राघोपूर विधानसभा मतदारसंघात अनिल कुमार सिंह, बाखरी मतदारसंघातून विकास कुमार, अमरपूर मतदारसंघातून अनिल सिंह, पाटणा साहीब मतदारसंघातून आदिल आफताब खान, मोहनिया मतदारसंघातून डॉ. भारती अनुराधा, सासाराम मतदारसंघातून आशुतोष कुमार सिंह, दिनोरा मतदारसंघातून मनोजकुमार सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसTejashwi Yadavतेजस्वी यादवNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी