शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:24 IST

1 / 7
सौंदर्याला आत्मविश्वास, विचार आणि प्रतिभेची जोड देत ऐश्वर्या राज यांनी मिसेस बिहार २०२५ किताब पटकावला. या स्पर्धेत १४ महिला सहभागी झाल्या होत्या.
2 / 7
ऐश्वर्या राज या भोजपूरमधील बडहराचे भाजपचे आमदार विशाल प्रशांत सिंह यांच्या पत्नी आहेत.
3 / 7
मिसेस बिहार २०२५ ही स्पर्धा पटणामध्ये आयोजित करण्यात आली होती. ऐश्वर्या यांनी स्पर्धा जिंकल्यानंतर आमदार विशाल सिंह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केले.
4 / 7
ऐश्वर्या राज यांना महिला सशक्तीकरणासाठी काम करायचं आहे. लग्नानंतर आयुष्य थांबतं असं काही नाही. तुमच्यामध्ये करण्याची जिद्द असेल, तर गोष्टी करता येतात.
5 / 7
ऐश्वर्या यांचे सासरेही आमदार होते. नरेंद्र पांडेय उर्फ सुनील पांडेय हे चार वेळा आमदार राहिलेले आहेत.
6 / 7
ऐश्वर्या यांचे सुरूवातीचे शिक्षण पटणामध्ये झाले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
7 / 7
अर्थशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. एका विमान कंपनीची परीक्षाही त्या पास झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांचे लग्न झाले. नंतर मुल झाले. आता त्यांनी पुन्हा आपली स्वप्न पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरल