शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Accident: पोलीस शिपाई पत्नीसह खड्ड्यात, दुचाकीही पावसाच्या पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 6:29 PM

1 / 7
पावसाळ्यात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचते, रस्त्यांवरील खड्डे पाणीमय होतात. त्यातून अनेक अपघाताच्या घटनाही घडत असतात.
2 / 7
उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथे एका दुचाकीस्वार कपल्सचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुचाकीस्वारास पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते स्कुटीसह खोल खड्ड्यात पडले.
3 / 7
अलीगढमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दुचाकीसह दोघेही गाडीसह पाण्यात पडतानाचे दिसून येते.
4 / 7
त्यानंतर तात्काळ स्थानिक लोकं घटनास्थळी धाव घेत खड्ड्यातून अपघातग्रस्तांना बाहेर काढतात. मात्र, त्यांची गाडी खड्डयातच राहते.
5 / 7
अलीगढच्या किशनपूरजवळ शनिवारी झालेल्या पावसानंतर पोलीस शिपाई त्याच्या पत्नीसह रस्त्यावर जात होता. त्यावेळी, रस्त्यातच ही दुर्घटना घडली.
6 / 7
अपघाताची ही दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7 / 7
अपघातग्रस्त पीडित पोलीस शिपाई आणि त्यांच्या पत्नीला किरकोळ जखम झाली असून त्यांनी जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्याचे समजते.
टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊसaligarh-pcअलीगढ