हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 00:11 IST2017-11-10T00:02:30+5:302017-11-10T00:11:05+5:30

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झाले.

या निवडणुकीत 50 लाख मतदारांनी मतदान केले असून, 68 जागांवर उभे असलेल्या 337 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद झाले आहे

सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन खराब झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत.

काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी 80 टक्के केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांना हिमाचल प्रदेशमध्ये तैनात करण्यात आले होते.