12 वर्षांतून एकदा उमलतं हे फूल, मोदींनी केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:13 IST2018-08-15T15:07:58+5:302018-08-15T15:13:07+5:30

देशभरात आज 72वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना 12 वर्षांतून एकदा फुलणा-या फुलाचा उल्लेख केला होता.
या फुलासंदर्भात सगळ्यांनाच जाणून घ्यायची इच्छा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण भारतात नीलगिरीच्या डोंगरात फुलणा-या निलाकुरिंजी या फुलाचा उल्लेख केला आहे.
निळ्या रंगाचं हे फूल फारच सुंदर असतं. जे कोणालाही मनमोहक भासतं.
इतर फुलांपेक्षा हे फूल विशेष असतं. नीलकुरिंजी हे फूल मुन्नारच्या पठारांमध्ये उगवतं. विशेष म्हणजे 12 वर्षांतून एकदा हे फूल फुलत असल्यानं जगभरातून पाहायला पर्यटक येतात.