शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जागतिक नदी दिवस; नाते नदीसोबतचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 9:46 AM

1 / 8
मार्क अंजेलो या जागतिक जलतज्ज्ञाच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक नदी दिवस साजरा करण्याचे निश्चित केले.
2 / 8
संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानुसार २००५ मध्ये जगातील ६० देशांनी जागतिक नदी दिवस साजरा केला. या वर्षी हा दिवस २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
3 / 8
मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नदीच्या काठी झाला. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे. जगभरात प्रमुख सर्व शहरे नदीच्या काठी वसल्याची व विकास पावल्याचे आढळून येते.
4 / 8
आदिम काळापासून माणूस नदीची पूजा करीत आला आहे. आजही काही आदिवासी समुदायांमध्ये नदी, झरे यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते.
5 / 8
मानवाच्या विकासात नदी ही अपरिहार्य बाब होती आणि आजही आहे. मात्र, आज नळाने पाणीपुरवठा होणाऱ्या आपल्या या समाजाला नद्यांचे महत्व वाटेनासे झाले आहे.
6 / 8
शहरी भागातील माणसाला आपण वापरीत असलेले पाणी कुठून येते आणि आपण सांडपाणी जे नाल्यामध्ये सोडतो ते शेवटी कुठे जाते, याबद्दलची माहितीही नसते. शिवाय याबाबत काही देणे घेणेही नसते. अर्थात काही सजग नागरिकांचा याला अपवाद आहे.
7 / 8
नदी ही त्याकाठी राहणाऱ्या माणसांचा आरसा असतो. नदीकाठची माणसे कशा प्रकारचे आहेत हे नदीपात्र आणि नदीमधील पाणी बघून सहज सांगता येईल.
8 / 8
मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी नदी आपल्याला इतके काही देते, ज्यातून मानवाची संस्कृती विकसित आणि समृद्ध होते, पण आपण परत नदीला काय देतोय?
टॅग्स :riverनदी