आजपासून सुरू झाला दहावीचा परीक्षा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 19:42 IST2023-03-02T18:42:24+5:302023-03-02T19:42:12+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीची परीक्षा सुरू झाली. शाळाशाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्कंठेने व काहीशा तणावात फिरताना दिसत होते. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. या परीक्षा सोहळ्याची क्षणचित्रे टिपली आहेत, लोकमत नागपूरचे छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांनी.

परीक्षेला जाण्याआधी शिक्षकांचा आशीर्वाद घेण्यासाठी उडालेली झुंबड

चला चला परीक्षेला चला.. असं म्हणत विद्यार्थ्यांचे झुंड शाळांमध्ये फिरताना दिसत होते.

परीक्षेला जाताना सोबत कॉपी तर नेली जात नाही ना.. याची खबरदारीही घेतली जात आहे.

मुलाला परीक्षेसाठी नेताना वडील

विद्यार्थिनीला मदत करणारी विद्यार्थिनी

तपासा तपासा.. काही निघतेय का ते पहा

मैत्रिणीने दिलेली डोळस साथ..


















