असल्फा व्हिलेज झळाळून निघालं विविध रंगांनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:28 IST2018-01-18T21:05:56+5:302018-01-19T13:28:37+5:30

मुंबईतल्या घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज हा सध्या एखाद्या कॅन्व्हासवर वेगवेगळ्या रंगांची स्टिकर चिटकवावीत तसा दिसू लागला आहे. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)
असल्फा व्हिलेज विविध रंगांच्या नक्षीकामानं उजळून निघालं आहे.
असल्फा व्हिलेजमध्ये सुंदर चित्रांमुळे भिंतीवरील पाइपांनाही चांगलीच झळाली मिळाली आहे.
असल्फा व्हिलेजमधील भिंतींवरही काढण्यात आलेल्या चित्रांमुळे अनेक कॉलेज तरुणींनी सेल्फी काढण्याचाही आनंद लुटला आहे.
दुकानांनाही विविध प्राण्यांच्या चित्रांनी रंगवून टाकल्यानं ती दुकानंसुद्धा स्थानिकांचं लक्ष वेधून घेत होते.
‘चल रंग दे’ संस्थेच्या या मोहिमेत अनेक ब्रश एकत्र आले अन् त्यांनी या दोन हजार कुटुंबांच्या झोपडपट्टीत सामाजिकतेचेही रंग भरले.