शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:29 IST

1 / 6
रॅडीसन हॉटेलच्या पाठीमागील एका उच्चभ्रू इमारतीतील सदनिकांमध्ये रेव्ह पार्टीवर रविवारी पहाटे छापा पडला आणि दोन बडे मासे गळाला लागले आहेत. रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा याच्यासह सात जणांना पोलिसांनी मध्यरात्री रंगेहाथ पकडले आहे.
2 / 6
महत्वाची बाब म्हणजे यामध्ये पाच पुरुष आणि दोन महिला पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर तीन महिला पळून गेल्या आहेत. या तीन महिला कोण, कशासाठी तिथे आल्या होत्या, रेव्ह पार्टीमध्ये पाच पुरुषांसोबत पाच महिला असे गणित जुळून येत आहे. यामुळे तिथे रेव्ह पार्टीसोबत कॉल गर्लही होत्या का असाही सवाल आता उपस्थित होत आहे.
3 / 6
प्रांजल खेवलकर हा शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोपटाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्याचे रिपोर्ट येतात याकडे पोलिसांचे आणि एकंदरीतच राजकीय वर्तुळासह पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
4 / 6
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या इमारतीतील फ्लॅटवर पोलिसांनी छापा मारला त्याबाबतही मोठी माहिती समोर येत आहे. या इमारतीत अशा पार्टीसाठी फ्लॅट भाड्याने दिले जातात आणि त्यांचे बुकिंग हे ऑनलाईन होत असल्याचे समोर येत आहे.
5 / 6
अशाप्रकारे तीन फ्लॅट एका रात्रीसाठी भाड्याने घेण्यात आले होते. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये रोहिणी खडसेंचा पती आणि इतर आरोपी रोव्ह पार्टी करत होते. तर त्या उरलेल्या दोन फ्लॅटमध्ये पळून गेलेल्या तीन तरुणी होत्या, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
6 / 6
राज्यात सध्या आजी-माजी मंत्री, अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत होते. यात एकनाथ खडसे त्यांचे राजकीय विरोधक गिरीष महाजन यांच्यावर आरोप करत होते. आता खडसेंचाच जावई यात सापडल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.
टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेeknath khadseएकनाथ खडसेDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी