शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे यांनी शेअर केले होणाऱ्या जावयाचे खास फोटो, रेवती आणि सारंगच्या लग्नाबाबतही दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:50 IST

1 / 9
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं.
2 / 9
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं सारंग अरुण लखानी यांच्यासोबत लग्न ठरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुळे आणि लखानी कुटुंबीयांमधील ही सोयरिक जुळल्याचे सांगण्यात येत आहे.
3 / 9
सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या संदर्भातील माहिती दिली आहे. मात्र या दोघांचाही विवाह सोहळा कधी होणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
4 / 9
दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रेवती सुळे यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. यासह तीन फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
'आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती आणि अरुण लखाणी यांचा मुलगा सारंग लग्न करणार आहे, असे या पोस्टमध्ये सुळे यांनी सांगितले आहे.
6 / 9
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.
7 / 9
सारंग हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
8 / 9
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे.
9 / 9
बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार