झटपट रोजगारासाठी विद्यार्थ्यांची आयटीआयला गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:36 PM2022-07-30T16:36:45+5:302022-07-30T16:40:32+5:30

प्रत्येकाचे कमी वयात चांगली नोकरी मिळवून जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न असते. आयटीआयचा कोर्स केल्यानंतर कंपनीत चांगली नोकरीची संधी मिळते.

प्रत्येकाचे कमी वयात चांगली नोकरी मिळवून जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न असते. आयटीआयचा कोर्स केल्यानंतर कंपनीत चांगली नोकरीची संधी मिळते.

कमी कालावधीत आणि कमी खर्चात कोर्स पूर्ण होत असल्यामुळे आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थांची गर्दी होत आहे.

तालुक्यात १ शासकीय, १ खासगी आयटीआय पनवेल तालुक्यात शासकीय व खासगी असे दोन आयटीआय आहे. नावडे येथे खासगी आयटीआय आहे. तर पनवेल शहरात शासकीय आयटीआय आहे.

७९६ जागा आणि १ हजार ५०० अर्ज पनवेल शहरात असलेल्या शासकीय आयटीआय संस्थेत १९ ट्रेड साठी ७५६ जागा आहेत. तर नावडे येथील खासगी संस्थेत २ ट्रेडसाठी ४० जागा आहेत.

फिटर फिटर हा आयटीआय मधला सर्वांत लोकप्रिय ट्रेडपैकी एक महत्त्वाचा आहे. विद्यार्थांचा कल फिटर कडे आहे.

वेल्डर कंपनी अथवा खासगी व्यवसायात कामी येणार वेल्डर हा ट्रेड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या ट्रेडकडे अधिक आहे.

इलेक्ट्रिशियन पनवेल तालुक्यातील आयटीआय संस्थेत दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. यामध्ये नोकरीच्या संधी आहेत.

अशी होईल फेरी २८ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. २९ जुलै ते २७ ऑगस्टदरम्यान चार फेऱ्या होणार असून १ ते २७ ऑगस्ट दरम्यान नव्याने अर्ज करावयाचे आहे. २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालवधीत समुपदेशन प्रवेशफेरी होणार आहे

रोजगार आणि संधीही कंपनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना घेण्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू घेते. याशिवाय कौशल्य मिळाल्यामुळे स्वत:चा रोजगारही उभा करता येतो. यातून आयटीआय प्रवेशासाठी दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.