शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sharad Pawar Birthday : पॉवर @80! शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमतचा "विशेषांक"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 10:09 AM

1 / 6
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने काढलेला विशेष अंक आज लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी शरद पवार यांना सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेटून दिला. वाढदिवसाच्या शुभेच्छाही लोकमतच्या वतीने दिल्या.
2 / 6
शरद पवार यांनी बारकाईने अंक पाहिला. आस्थेने लोकमत'च्या कार्याची चौकशीही केली. लोकमतचे मुंबईतील ऑफिस कुठे आहे? कशा पद्धतीने या काळात काम चालू आहे? हे देखील त्यांनी आवर्जून विचारले.
3 / 6
देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तथा कृषी, उद्योग व क्रीडा विश्वावर अमीट ठसा उमटवणारी सुपर 'पॉवर' म्हणजे शरद पवार.
4 / 6
आजचा आधुनिक महाराष्ट्र आणि देशाच्या नव्या आर्थिक धाेरणाला आकार देण्यात त्यांचा माैलिक वाटा आहे, त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ लाेकशाहीची मंदिरे असलेल्या विधिमंडळ आणि संसदेत अविरत काम करण्याचादेखील त्यांचाच विक्रम आहे.
5 / 6
गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलीच. सर्वांत माेठी कामगिरी त्यांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून केली. सलग दहा वर्षे देशाच्या कानाकाेपऱ्यांत जाऊन तेथील शेती उत्पादन कसे वाढेल, याचा ध्यास घेतला हाेता.
6 / 6
राजकारणाव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची यशस्वी जबाबदारी स्वीकारली. कुस्ती, कबड्डीसारख्या भारतीय खेळांना प्राेत्साहन दिले. मराठी भाषेत इतर भाषांतील साहित्यकृती कशा येतील, यासाठी प्रयत्न केले.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसLokmatलोकमतPoliticsराजकारण