शरद पवारांची 'राज' उलगडणारी मुलाखत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 11:02 AM2018-02-22T11:02:16+5:302018-02-22T11:04:29+5:30

जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली.

बृहन्ममहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे दोन तास रंगलेली ही मुलाखत ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर पवार यांना बोलते करताना राज यांनी आपल्या प्रशांचा सगळा रोख मराठी माणूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच ठेवला.

यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचे मूल्याधिष्ठित राजकारण सध्या दिसत नाही, या राज यांच्या प्रश्नावर पवार यांनी थेट मोदींवर हल्ला चढविला.

मुलाखतीच्या शेवटी रॅपिड फायर प्रश्नावर ‘राज की उद्धव?’ अशी गुगली राज ठाकरे यांनी टाकली. मात्र जागतिक क्रिकेटचा अनुभव असलेल्या पवारांनी ‘ठाकरे घराणे’ असे उत्तर देत राज यांचा चेंडू सीमापार टोलविला.