दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 23:08 IST2017-10-13T23:02:10+5:302017-10-13T23:08:22+5:30

दिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण..या सणाला महालक्ष्मी पूजेसाठी नवे कपडे परिधान केले जातात. म्हणूनच या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात असतो. (फोटो - सुशिल कदम)

दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील विविध ठिकाणच्या बाजारात ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. (फोटो - सुशिल कदम)

घर उजळून टाकणा-या आकाशदिव्यांच्या खरेदीची लगबग आणि विविध रंगीबेरंगी आकाश कंदिलांच्या रोषणाईने बाजार उजळून निघाले आहेत. (फोटो - सुशिल कदम)

वाढत्या गर्दीमुळे सायंकाळच्या वेळेस बाजारात पाय ठेवायला जागा अपुरी पडतेय.

आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.

वेगवेगळ्या कारखान्यामध्ये रांगोळीमध्ये कलर मिसळून पॅकिंगचे काम सुरू झालेले आहे. एकूणच दिवाळी जवळ येईल, तसतशी बाजारपेठ गजबजून जाऊ लागली आहे.

टॅग्स :दिवाळीdiwali