शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Riaz Bhati With Politician: देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून नरेंद्र मोदींपर्यंत; सर्वपक्षीय नेते, सेलेब्रिटींसोबत रियाझ भाटीचे फोटो, त्याच्यावर आहेत अनेक गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 1:26 PM

1 / 14
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दाऊदचा माणूस असलेल्या रियाझ भाटीसोबत देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र आता रियाझ भाटीचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.
2 / 14
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यापासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांसोबत रियाझ भाटीचे फोटो असल्याचे समोर आले आहे.
3 / 14
देवेंद्र फडणवीस यांचे रियाझ भाटीसोबतचे काही फोटो समोर आले आहेत. त्यातील एका फोटोत फडणवीस आणि रियाझ भाटी.
4 / 14
रियाझ भाटीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटोही समोर आला आहे. मात्र हा फोटो नेमका कधीचा आहे हे समजू शकलेले नाही.
5 / 14
एका फोटोमध्ये रियाझ भाटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये काही अन्य व्यक्तीही दिसत आहे.
6 / 14
रियाझ भाटीचा शरद पवारांसोबतचा फोटोही समोर आला आहे. यामध्ये तो शरद पवार यांना भेटवस्तू देताना दिसत आहे.
7 / 14
शिवसेनेचे युवानेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांचाही रियाझ भाटीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अनिल परब हेही दिसत आहेत.
8 / 14
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतही रियाझ भाटीचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये काही अन्य नेतेही दिसत आहेत.
9 / 14
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचाही रियाझ भाटीसोबतचा एक फोटो समोर आला आहे.
10 / 14
नवाब मलिक यांनी रियाझ भाटीशी संबंध जोडून देवेंद्र फडणवीसांवर आरोप केल्यानंतर आशिष शेलार यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र या आशिष शेलार यांचाही रियाझ भाटीसोबतचा एक फोटो समोर आला आहे.
11 / 14
तसेच अभिनेता संजय दत्त याच्यासोबतही एका फोटोमध्ये रियाझ भाटी दिसत आहे.
12 / 14
रियाझ भाटी हा सध्या बेपत्ता आहे. त्याला बनावट पासपोर्टप्रकरणात अटक झाली होती. मात्र तो दोन दिवसांत सुटला होता, असा दावा मलिक यांनी केला आहे.
13 / 14
दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीया मानल्या गेलेल्या रियाझ भाटीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसही बजावण्यात आली होती.
14 / 14
रियाझ भाटी हा हवाला व्यवसायात सहभागी असल्याचा आरोप आहे. तसेच २००८ चा खंडाळा गोळीबार, तसेच भूखंड बळकावण्यामध्येही त्याच्यावर आरोप झाले होते.
टॅग्स :nawab malikनवाब मलिकPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी