शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना निवडणूक लढवता येते; मात्र मतदान करण्याचा अधिकार नाही ! कोणत्या कैद्यांना करता येईल मतदान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:19 IST

1 / 5
तडीपारांना मतदानाचा हक्क बजावता येणार - तडीपार आरोपींना मतदानाच्या दिवशी ठरावीक कालमर्यादेत त्यांच्या मतदारसंघात येऊन मतदान करण्याची परवानगी असते.
2 / 5
या आहेत अटी-शर्ती आणि प्रक्रिया - पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी, ठरावीक वेळेत ये-जा आणि थेट मतदान केंद्रावर हजेरी लावणे या अटींचे पालन करणे बंधनकारक असते.
3 / 5
यांनाही आहे मतदानाचा अधिकार - स्थानबद्ध आरोपी, न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी टपाली मतदानाद्वारे आपला मताधिकार बजावू शकतात. कैद्यांना निवडणूक लढवता येते. कायद्याअंतर्गत शिक्षा झालेला कैदी निवडणूक लढवू शकतो, जोपर्यंत त्याच्यावर ठरावीक कालावधीची अपात्रता लागू होत नाही.
4 / 5
मताधिकार नाही - कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही, हा स्पष्ट कायदेशीर नियम आहे.
5 / 5
यांनाही मतदानाचा अधिकार नाही - शिक्षा झालेल्या कैद्यांसह न्यायालयाने अपात्र ठरवलेले काही दोषी व्यक्ती मतदान करू शकत नाहीत.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६nagpurनागपूरElectionनिवडणूक 2026Votingमतदान