शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या नाहीत, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:06 PM

1 / 17
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णांची होणारी गैरसोय यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंना पत्र लिहले आहे.
2 / 17
आपल्या पत्रातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागीय भागातील कोरोना संदर्भातील परिस्थिती फडणवीस यांनी मांडली आहे.
3 / 17
मुंबईतील सरकारी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून विलिगीकरण कक्षात ना वेळेवर जेवण मिळते, ना पाणी. तर, दुसरीकडे खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याचेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
4 / 17
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल 6 पानी पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाबाधित परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत.
5 / 17
'राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत हे पत्र लिहित असल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले.
6 / 17
रुग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेनं जाहीर केले नाहीत, त्यासंदर्भातील आकडेवारीचा तात्काळ पडताळणी करावी
7 / 17
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, बेडची संख्या वाढवावी, तसेच व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजनयुक्त बेड उपलब्ध करुन द्यावेत
8 / 17
राज्यात सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणून रुग्णसंख्या जास्त हे गृहितच चुकीचं आहे, कारण प्रतिदहालाख लोकसंख्येमागे चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे.
9 / 17
रुग्णांना 14 तास ते 30 तासांपर्यंत रुग्णालयात प्रवेश मिळत नाही, रुग्णवाहिकाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.
10 / 17
मनुष्यबळाचा अभाव असून केवळ 30 ते 40 टक्के स्टाफच्या जीवावार आरोग्ययंत्रणा जीवाचं रान करताना दिसून येत आहे.
11 / 17
खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सामान्य माणूस तेथे जाण्यास धजावत नाही
12 / 17
अॅक्टमेरा आणि रेमडेसीवीर या औषधांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. ही औषधे बाजारात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
13 / 17
फडणवीसांनी आपल्या पत्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई या विभागांसाठी स्वतंत्रपणे काय उपाययोजनांची गरज आहे, हेही स्पष्टपणे सांगितले आहे.
14 / 17
सोलापूरात अद्यापही डॅशबोर्ड तयार केलेला नाही, त्यामुळे रुग्णांना इकडे-तिकडे भटकावे लागत आहे.
15 / 17
मराठवाड्यातील औरंगाबाद येथे रुग्णसंख्या वाढत आहे, खासगी रुग्णालयांची मनमानी सुरू आहे
16 / 17
चाचण्यांचे अहवाल येण्यास 3-3 दिवस लागतात, त्यामुळे कोरोना असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही रुग्णांवर उशिराने उपचार होत आहेत
17 / 17
चाचण्यांचे अहवाल येण्यास 3-3 दिवस लागतात, त्यामुळे कोरोना असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही रुग्णांवर उशिराने उपचार होत आहेत
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे