कोल्हापूरकर रमले फुलांच्या दुनियेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:01 IST2017-12-25T12:59:43+5:302017-12-25T13:01:46+5:30

कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्प (केएसबीपी)यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ येथील पोलीस उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला.

मनाला प्रसन्न करणारी लाखो रंगीबेरंगी फुले, फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना कोल्हापूरच्या पोलीस उद्यानामध्ये रविवारी पाहायला मिळाल्या.

फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यांना केलेली मनमोहक पुष्परचना येथे पाहायला मिळाली.

या ठिकाणी सेल्फी पार्इंट विकसित केल्याने सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी, युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती.